विनोद
झंप्या : ए पंप्या, एवढा घाबराघुबरा का झालायस बुवा तू?
पंप्या : अरे, थोडं कन्फ्युजन झालं यार.
झंप्या : म्हणजे?
पंप्या : अरे मी रस्त्यावरून चाललो असताना मला समोर काहीतरी दिसलं.
मला वाटलं की साप आहे. पण नेमकी ती काठी होती.
झंप्या : हात्तिच्या...एवढंच ना.
पंप्या : हो रे...पण मग त्या सापाला मारण्यासाठी म्हणून
मी जी काठी उचलली ना, तो खरा साप निघाला.
एकदा संता बंताला स्वत:च्या घरी बोलावतो,
जेव्हा संता बंताच्या घरी जातो तेव्हा,
बंताच्या घराला टाळे लावलेले असते
आणि तिथे लिहुन ठेवलेले असते " तुझा पोपट झालाय , चल फूट इथून "
संता खाली पड्लेला खडु उचलतो आणि लिहितो
"मी आलोच नव्हतो"
पप्पू 5 मिनिटात पेपर देऊन जाऊ लागतो..
शिक्षक :- का रे पप्पू .......पेपर मधल काही येत नाही का? .
.
.
.
.
पप्पू - तसं नाही सर...... मला उद्याच्या पेपरचा
अभ्यास करायचा आहे.... म्हणून लवकर चाललोय.....
सर : सांग गण्या तुझा जन्म कुठे झाला?
गण्या : अहमदनगर...
सर : चल त्याची स्पेलिँग सांग बरं...
हुशार गण्या थोडा विचार करतो
आणि म्हणतो : नाही, नाही.... माझाजन्म पुण्यात झाला..
गणपतराव : काय हो , वसंतराव
तुमची बायको सकाळी सतार घेऊन कोठे गेली ?
वसंतराव : कारागृहामध्ये
तिच्या गाण्याचा कार्यक्रम आहे ना .
.
.
.
.
.
.
गणपतराव : असं होय , सरकारने
कैद्यांची शिक्षा आणखी कडक
करायची ठरवलीयं तर !
गण्या दारु पिउन
घरी येतो..
वडिलांना संशय येऊ नये
म्हणून laptop उघडून
बसतो..
थोड्या वेळाने,
वडील- गण्या, दारू पिऊन
आलायस का?
गण्या- नाही हो..!!
वडील- मग
माझी suitcase उघडून
काय type करतोयस?