अग्निपंख (अब्दुल कलाम)
एक तारा अणुगाभ्यातून पाहता पाहता निखळला
अग्निस्त्रोत्यांच्या उर्जेसाठी अवकाशात मिसळला
कार्यमग्न रहा त्याचा संदेश आम्ही मनात रुजवला
परंतु त्याच्या असण्यासाठी अवघा देश हळहळला
शस्त्रांचे हे अमूल्य दान आमुच्या पदरी देऊन गेला
देशभक्तीचे अमृत बीज अमुच्या हृदयी रोवून गेला
जागवू आम्ही तुझी वचने जागवू तुझ्या कर्तुत्वाला
हिच तुजला श्रद्धांजली प्रियतम कलाम अब्दुल्ला
शशिन वरधावे, कांदिवली (पश्चिम), मो ९६१९३२१५४५
E-mail: vardhave@gmail.com
www.photoclicks.co.in
का कळेना
का कळेना
मावळतीच्या कातरवेळी
मन हे का कातर होई???
का कळेना
आठवणीत तुझ्या
मन हे का हळवे होई???
का कळेना
विसरण्याच्या बहाण्याने
तुझी सय का गडद होई???
का कळेना
तोडले तू पाश प्रेमाचे तरी
तुझ्या सईने मनास का वेदना होई???
विकलो होतो
उपकाराच्या ओझ्याखाली दबलो होतो
कर्ज फेडण्या बाजरी मी विकलो होतो
लिलाव होणे आयुष्याचा टळू न शकले
लिहून खाते नादारीचे थकलो होतो
मृगजळ पुढती पाठलाग मी करता करता
शुन्यासंगे दोस्ती करण्या शिकलो होतो
कधीच नव्हती हाव मनाला सन्मानाची
परिस्थितीच्या रेट्यापुढती झुकलो होतो
आनंदाचे स्वप्नही कधी पडले नाही
तरी कधी मी माझ्यावरती हसलो होतो
मैत्री माझी वेदनांसवे घट्ट एवढी!
काट्यांवरती शांत शांतसा निजलो होतो
सूर्य मला का म्हणता? मी तर लपून जगलो
उगवायाच्या अधीच मी मावळलो होतो
नोंद न झाली जगात माझी, जणू काय मी
अनंतात मरण्याचाआधी विरलो होतो
दैव मागणे “निशिकांता”ला जमले नाही
प्राक्तनात जे मुकाट देवा जगलो होतो
निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३
दोन पाखरांचा संसार होता
दोन पाखरांचा संसार होता...
वास्तवात नाही पण तिच्या स्वप्नात होता..
१४ फेब्रुवारी ला लग्न...
आणि व्हायचा विचार होता..
लग्नानंतर रोज एक चोकलेट..
आणि रोज बाहेर फिरायला जायचं असा तिचा हटट होता..
आपले चौघांचे कुटुंब असेल..
मोठी कृपा तर छोटा पार्थ असेल...
दर १ नोव्हेंबर ला कैंडललाइट डिनर..
तिथे आपल्या दोघं शिवाय आणखी कुणी नसेल..
आपल्या दोघांच छोटस घर असेल..
गुलाबी भिंती आणि मार्बल फ्लोर असेल..
कृपा ला डॉक्टर आणि पार्थ ला स्पोर्टसमन बनवायचे...
आणि आपण आपल्या जबाबदारीतुन मुक्त व्हायचे....
आमच्या ह्या संसाराला कुणाची तरी नज़र लागली...
आमच्या स्वप्नाची नाव नशिबाच्या सागरात बूडू लागली..
त्या बुडणाऱ्या नावेकडे बघन्यावाचून कोणताच पर्याय नव्हता...
घात करणाऱ्या त्या लाटा थाम्बायाचे नाव घेत नव्हत्या...
शेवटी स्वप्नांची ती नाव बूडून गेली...
पाखरांच्या स्वप्नाना तडा देऊन गेली..
स्वप्न तुटल्याने ती दोन पाखरे तडफडत होती...
आता कधी जिव निघून जातो ह्याकडे नज़र लागली होती..
टाळ वाजती वाजती
टाळ वाजती वाजती , मृदुंग बोलती बोलती
अवघे भक्त चालSती, पंढरीच्या वाटेवरती...II धृ II
येथे नाही जातीभेद, येथे नाही वर्णभेद,
येथे नाही प्रांतभेद, हीच विठोबाची शक्ती...II १ II
अवघे भक्त चालती..पंढरीच्या वाटेवरती..
विश्व सारे अंधारले, सर्व सगुण लोपले,
परि संतरूपी रक्षियले, हीच विठोबाची शक्ती... II २ II
अवघे भक्त चालती..पंढरीच्या वाटेवरती..
युगे येतील जातील, जन बुडतील तरतील,
परि विठ्ठल निश्चल...सुधा म्हणे तेथे मुक्ती... II ३ II
अवघे भक्त चालती..पंढरीच्या वाटेवरती.........
हिंदुहृदयसम्राट : एक प्रतिभावान शलाका ( १८. ११. २०१२ )
ऋद्राक्षांची अखंड माला हाय अखेरी भंग पावली
एक शलाका प्रतिभावान विश्वहिंदुत्व जगुन गेली
अर्धतपाच्या राज्यप्रवासी मराठीचे ती श्वास झाली
हीनदीन जनतेच्या कंठी लढण्याचा आवाज झाली
समर्थ स्वयंभूत प्रतिभेतून सार्थ जगणे दावून गेली
बुलंद मराठी हृदयांमधुनी महाराष्ट्राचा घोष बनली
एकाच हाक व एक इशारा ठिणगीची मशाल केली
शब्दांप्रती जे देतील प्राण ऐसी सैनिक सेना केली
सन्मान हरपल्या जनांस प्रतिकाराची शक्ती दिली
खेडोपाडी अन प्रांतोप्रांती संघराज्याची गुढी रोवली
ऋद्राक्षांची ही माला अता असेल जरी भंगली गेली
परि शिवधनुच्या प्रत्यंचे व्याघ्रशरांचे गर्जन झाली
- स्वच्छंद ९८३३२१११०२